द्रोणागिरी महोत्सवाचे आयोजन

। उरण । वार्ताहर ।
द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे जिल्हा स्तरीय 21 वा युवा महोत्सव दि. 2 ते 6 जानेवारी 2022 दरम्यान एन.एम.एस.ई (सेझ) मैदान, बोकडवीरा, तालुका उरण येथे मान्यवरांच्या उपस्थितीत कोरोना विषयक सर्व नियम व अटींचे पालन करत सोशल फिजिकल डिस्टन्स पाळून मास्क व सॅनिटायझरचा वापर करून नियमांच्या अधिन राहून संपन्न होणार असून विविध देशी विदेशी असे 132 हुन अधिक स्पर्धांचा या महोत्सवात समावेश आहे. यावर्षी या स्पर्धेचे उद्घाटन रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते होणार असून अनेक मंत्री, दिग्गज नेते, विविध सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील नामवंत प्रसिद्ध व्यक्ती, सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा महोत्सव संपन्न होणार आहे.

Exit mobile version