| अलिबाग । वार्ताहर ।
महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग, णछऊझ व महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या पुढाकाराने संस्थेच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्य स्कूल सेफ्टी कार्यक्रमांतर्गत राज्यातील 34 जिल्ह्यांमधील 34 शाळा-महाविद्यालयांमध्ये नागरी संरक्षण दल व होमगार्ड यांच्या मदतीने मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले आहे.
हे मॉकड्रिल नागरी संरक्षण दल व होमगार्ड विभागातील अधिकारी त्या-त्या शाळा/महाविद्यालयातील संबंधित शिक्षकांशी समन्वय साधून दि.28 नोव्हेंबर ते दि. 14 डिसेंबर 2022 या कालावधीत पार पडणार आहेत. या मॉक ड्रिलमध्ये विद्यार्थ्यांना धोक्याची सूचना, आग विमोचन, स्थलांतर याची प्रात्यक्षिके दाखविण्यात येणार आहेत.या मॉक ड्रिलसाठी रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील के.ई.एस.व्ही.एच.परांजपे या शाळेची निवड करण्यात आली आहे.