आगरदांडा | वार्ताहर |
कोरानाविरोधात लढाई जिंकण्यासाठी कोव्हिड-19 लस महत्वाची आहे.हे लसीकरण 100टक्के पूर्ण होण्या करिता नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना लकी ड्रॉ मार्फत भेटवस्तू चे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतलेल्या लोकांची संख्या वाढुन शहरात कोरोनाला पुर्ण प्रतिबंध व्हावा या दृष्टिकोनातून अद्याप पर्यंत लसीकरण न झालेल्या नागरिकांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने नगराध्यक्षा स्नेहा पाटील व उपनगराध्यक्षा नौसिन दरोगे,मुख्याधिकारी पंकज भुसे, यांच्या कल्पनेतून दि 18 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत मध्ये लस घेणा-या नागरिकांना लकी ड्रॉ मार्फत आकर्षक भेटवस्तू देण्याची योजना नगरपरिषद शहरातील नागरिकांसाठी राबवण्यात सुरुवात केली आहे.
त्याचा लाभ घेण्याचे आवाहन बॅनर लावून तसेच शहरातील चौका चौकात दवंडी देऊन करण्यात आले आहे.या कालावधी मध्ये लस घेतलेल्या नागरिकांनी लस घेतलेल्या नंतर नगरपरिषद कार्यालयामध्ये येऊन आपल्या नावाची चिठ्ठी ड्रॉप बॉक्स मध्ये टाकावयाची आहे.सदरची लकी ड्रॉ 6डिसेंबर रोजी काढण्यात येणार आहे.काढलेल्या लकी ड्रॉ नुसार 20भाग्यवान नागरिकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार अशी माहिती नगरपरिषदेचे ओएस-परेश कुंभार यांनी दिली.