। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबई शहर कबड्डी असोसिएशन आयोजित आणि मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ पुरस्कृत कुमार गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा दि.22 ते 25 एप्रिल या कालावधीत आयोजन करण्यात आली आहे. या अगोदर घेण्यात आलेल्या दोन फेर्यानंतर कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ही स्पर्धा रद्द करावी लागली होती. आता ही स्पर्धा मुंबई ना.म. जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखाना मैदानावर झालेले सामने वगळून पुढे खेळविण्यात येईल.
या स्पर्धेचे उद्घाटन आज सायं. 4.30 वाजता होणार आहे. या स्पर्धेतून मुंबई शहराचा कुमार व कुमारी गटाचा संघ निवडण्यात येऊन तो पुढील महिन्यात पुण्यात होणार्या कुमार गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत मुंबई शहर संघाचे प्रतिनिधित्व करेल. तरी सर्व सहभागी संघांनी वेळेवर उपस्थित राहून स्पर्धा यशस्वी करण्यास संघटनेला सहकार्य करावे असे आव्हान या परिपत्रकाद्वारे मुंबई शहर कबड्डी असो. चे सचिव विश्वास मोरे यांनी केले आहे.
मुंबईची निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन
