श्रीवर्धनमध्ये राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन

। श्रीवर्धन । वार्ताहर ।
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या श्रीवर्धन येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. साधक व्यक्ती म्हणून सतिश प्रधान ज्ञानसाधना, ठाणे महाविद्यालयाच्या उप प्राचार्या डॉ.श्रद्धा भोमे उपस्थित होत्या.


महाविद्यालयाच्या नॅक समन्वयक डॉ. कल्याणी नाझरे यांनी प्रास्ताविक करुन डॉ. श्रद्धा भोमे यांचा परिचय करुन दिला. संशोधक विद्यार्थ्यांने संशोधन करताना संशोधन कसे करावे याचा विचार करूनच संशोधन करावे असे विचार प्राचार्य डॉ.श्रीनिवास जोशी यांनी व्यक्त केले. संशोधनासाठी आवश्यक असलेली माहिती प्राथमिक व दुय्यम स्त्रोताद्वारे उपलब्ध करतांना तटस्थपणे संशोधन कार्य करावे, तसेच साहित्याचे पुनर्विलोकन करतांना त्यांचे संदर्भीय मूल्य राखणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि संशोधन पद्धती निःपक्षपाती, तटस्थ व भविष्यातील संशोधन दृष्टिकोन विकसित करणारी असावी असे विचार डॉ.श्रद्धा भोमे यांनी व्यक्त केले.
सदर वेबिनारच्या यशस्वितेसाठी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य एस. बी. पंडित, सचिव व महासंस्थापक डॉ.एम एस.गोसावी, एच.आर.डायरेक्टर प्रा.डॉ. दिप्ती देशपांडे, विभागीय सचिव प्रा.डॉ.एस.व्ही.संत व शाखा सचिव प्रा.डॉ.एम.आर.मेश्राम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले

Exit mobile version