९ ऑक्टोबरला निसर्ग मॅरेथॉनचे आयोजन

शालेय विद्यार्थ्यांपासून आंतरराष्ट्रीय मरेथॉनपटू होणार सहभागी
| नेरळ | प्रतिनिधी |

राज्यातील अनेक ठिकाणी निसर्ग मॅरेथॉन यशस्वी करणार्‍या युनायटेड स्पोर्ट्स अँड अ‍ॅडवेंचरकडून नेरळ परिसरात निसर्ग मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. सगुणाबाग या कृषी पर्यटन केंद्रातून या स्पर्धेचा शुभारंभ होणार असून, 9 ऑक्टोबर रोजी ही निसर्ग मॅरेथॉन होणार आहे. दरम्यान, या मॅरेथॉन स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांसाठी तीन आणि पाच किलोमीटर अंतराच्या लहान आणि आंतराराष्ट्रीय मॅरेथॉनपटू यांच्यासाठी 50 किलोमीटर लांबीपर्यंतच्या स्पर्धा होणार आहेत.

निसर्ग मॅरेथॉन हा इव्हेंट राज्यातील लोणावळा आणि महाबळेश्‍वर येथे यशस्वी करणारे युनायटेड स्पोर्ट्स अँड अ‍ॅडवेंचरने कोकणातील तारकर्ली देवबाग येथे देखील निसर्ग मॅरेथॉन यशस्वी केली आहे. आता युनायटेड स्पोर्ट्स अँड अ‍ॅडवेंचर आपल्या निसर्ग मॅरेथॉनचा दुसरा टप्पा कर्जत तालुक्यात आयोजित करीत आहे. 9 ऑक्टोबर रोजी नेरळजवळील सगुणाबाग कृषी पर्यटन केंद्र आणि परिसरातील डोंगर कपारीतून वाट काढीत हो निसर्ग मॅरेथॉन सागूंवबाग येथे पुन्हा पोहचणार आहे. उत्तम आरोग्य व सुदृढ आयुष्य यावर आधारित या मॅरेथॉन मध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे यासाठी आयोजकांना मार्फत आवाहन करण्यात येत आहे.

9 ऑक्टोबर रोजी पहाटे पाच वाजता या निसर्ग मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात होणार आहे.या स्पर्धेसाठी राष्ट्रीय पातळीवरील 400 हुन अधिक मॅरेथॉनपटू सहभागी होणार आहे. निसर्ग मॅरेथॉन मध्ये लहान डोंगर शेती, नाले आणि लाला मातीच्या तसेच कच्चा रस्त्यावरून दिलेल्या मार्गाने मॅरेथॉनपटू आपले इच्छित स्थळ गाठतात. शालेय विद्यार्थ्यांसाठी तीन आणि पाच किलोमीटर अशी स्पर्धादेखील या निसर्ग स्पर्धेचा भाग असणार आहे. तर वरिष्ठ गटात 25 किलोमीटर, 37.5 किलोमीटर आणि 50 किलोमीटर अशी स्पर्धा असणार आहे.

सगुणाबाग कृषी पर्यटन केंद्रातून या स्पर्धेला सुरुवात होईल आणि सगुणाबागेतून निघालेले मॅरेथॉन पटू पुढे नेरळ-कळंब रस्त्याने बिरदोले असे निघून नंतर जंगल भागातून उंबरवाडी येथे पोहचतील तेथून देवपाडा तसेच चिंचवाडी,पोशीर तर मोठ्या लांबीचं मॅरेथॉन साठी चिंचवाडी येथून स्पर्धक जांभूळवाडी असे पुढे जाणार आहे तर पोशीर असा पुन्हा सगुणाबाग प्रवास करणार आहेत. आगाऊ नोंदणी आणि स्पर्धेत भाग घेण्यासाठी युनायटेड स्पोर्ट्स अँड अ‍ॅडवेंचर विकास मोरे -7977875816 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version