गोवे-कोलाड | वार्ताहर |
सुंदर रांगोळ्या रेखाटणार्या युवती व महिलांना प्रोत्साहित करणे व त्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी युवती काँग्रेस रोहा यांनी तालुकास्तरीय ऑनलाईन रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा फक्त रोहा तालुका मर्यादित आहे.स्पर्धेत फक्त महिला व युवतींना सहभागी होता येईल.स्पर्धा 5 व 6 नोव्हेंबर 2021 रोजी होणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्याला दिनांक 4 नोव्हेंबर 2021 पूर्वी 7887402011 ह्या मोबाईल क्रमांकावर आपले नाव-पत्ता व्हाट्सअप करावे लागेल.तरच आपले रजिस्ट्रेशन होईल.स्पर्धेचे ठिकाण आपले स्वतःचे घर हेच असणार आहे. 6 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री दहा वाजेपर्यंत प्राप्त रांगोळ्यांचा परिक्षणासाठी विचार करण्यात येईल.प्राप्त झालेल्या सर्व रांगोळ्यांचे तज्ज्ञ परिक्षकांद्वारे परीक्षण करण्यात येईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.