। चिरनेर । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्ष चिरनेरच्यावतीने 8 व 9 फेब्रुवारी रोजी चिरनेर येथील मातोश्री मैदानावर मर्यादित षटकांचे ओव्हरआर्म क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले आहेत. याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते प्रशांत काळशेठ खारपाटील यांनी दिली आहे. तसेच, या स्पर्धेत विजेत्या क्रिकेट संघांना प्रीतम म्हात्रे चषक प्रदान करण्यात येणार आहे.
या क्रिकेट सामन्यांसाठी 6 हजार रुपये प्रवेश फी आकारण्यात आली असून प्रथम येणार्या 16 संघांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच, हे सामने 5 षटकांचे खेळविले जाणार आहेत. या स्पर्धेत प्रथम येणार्या विजेत्या क्रिकेट संघाला 50 हजार रु. रोख रक्कम व चषक, तर द्वितीय क्रिकेट संघाला 25 हजार रु. रोख रक्कम व चषक देण्यात येणार आहे. तसेच, मालिकावीरासाठी कुलर देण्यात येणार असून उत्कृष्ट गोलंदाज व उत्कृष्ट फलंदाज यासाठी क्रिकेट शूज देण्यात येणार आहेत. या क्रिकेट स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी विवेक हातनोलकर (8108086526), दिनेश मोकल (8450976665), साईराज खारपाटील (8180023366), नितीन म्हात्रे (9892094385) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशांत खारपाटील यांनी केले आहे.