रायगड जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचे आयोजन

| गोवे-कोलाड । वार्ताहर ।

रायगड जिल्हा खो-खो असोसिएशनची 28वी पुरुष-महिला गटाची जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी प.पु. पांडुरंग शास्त्री आठवले विद्यालय, धाटाव, ता. रोहा येथे 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता प्रांगणात सुरू होणार आहे. याकरिता प्रवेश शुल्क संलग्नता शुल्क 200, प्रवेश शुल्क 200, खेळाडूनोंदणी शुल्क 150 असणार आहे. प्रत्येक संघासाठी प्रवेश स्वीकारण्याची अंतिम मुदत 29 ऑक्टोबर सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत असणार आहे. अधिक माहितीसाठी विशाल शिंदे, रोहा 9975242588, राकेश म्हात्रे, अलिबाग 8087463881 याच्यांशी संपर्क साधावा.

Exit mobile version