संभाजी महाराज जयंतीचे आयोजन

| चिरनेर | वार्ताहर |

उरण तालुक्यातील चिरनेर कातळपाडा गावात छावा प्रतिष्ठानच्या वतीने धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती 14 मे. रोजी साजरी करण्यात येणार आहे. या निमित्ताने गावात धर्मवीर संभाजी महाराजांच्या पालखीची मिरवणूक गावातून फिरविण्यात येणार असून, या पालखी मिरवणुकीत विविध स्तरातील प्रतिष्ठित मान्यवर मंडळी सहभागी होणार आहेत. दरम्यान शिवप्रेमी भाविकांना लेझीम व ढोल पथकाची जुगलबंदी, शिवकालीन मराठमोळ्या वेशभूषेतील तरुण-तरुणी या भव्य मिरवणुकीत रंगून जाणार आहे. यात प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, महाराणी जिजाबाई, महाराणी येसूबाई, सोयरा राणी, पुतळा राणी आणि मावळे आदी महान पुरुष व स्त्रियांच्या भूमिका साकारल्या जाणार आहेत.

Exit mobile version