। रायगड । क्रीडा प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने बुधवारी (दि.10) खोपोली येथील महाराजा बँक्वेट हॉल येथे सकाळी 10.30 वाजता रायगड जिल्ह्यातील सर्व अकॅडमी, क्लब व संघांच्या प्रशिक्षक आणि प्रतिनिधी यांच्या सोबत संवाद शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये 2024-25 च्या क्रिकेट हंगामात होणार्या विविध क्रिकेट स्पर्धांचे आयोजन, स्पर्धेची रूपरेषा व नियोजन करण्याबाबत चर्चा करून निर्णय घेणे, विविध वयोगटातील स्पर्धेत सहभागी होणार्या सर्व अकॅडमी, क्लब व संघ यांचा सहभाग निश्चित करणे, जिल्ह्यातील सर्व खेळाडूंचे राजिस्ट्रेशन करणे व त्यांना आरडीसीए मार्फत ओळखपत्र देण्याविषयी माहिती देणे, सर्व वयोगटातील होणार्या स्पर्धेसाठी नियम-नियमावली तयार करणे, मुलींच्या क्रिकेट स्पर्धांचे नियोजन करणे, महाराष्ट्र क्रिकेट अससोसिएशन मार्फत घेण्यात येणार्या निमंत्रित स्पर्धांपैकी काही सामने रायगड जिल्ह्यात घेण्याबाबत माहिती देणे. तसेच, रायगड जिल्ह्यात क्रिकेट वाढवण्यासाठी विविध मान्यवरांचे मार्गदर्शन व चर्चा या शिबिरामध्ये होणार आहेत.