| माणगाव | प्रतिनिधी |
शिवसेना-भाजप महायुतीतर्फे माणगाव ते महाड या मार्गावर सावरकर गौरव यात्रेनिमित्त बाईक रॅलीचे आयोजन बुधवारी (दि.12 )केले आहे. दुपारी 2 वाजता माणगाव तहसील कार्यालयाजवळील साई मंदिर येथून प्रारंभ होऊन पुढे हि रॅली कालवा मार्गे निजामपूर रोड, माणगाव बाजारपेठ पुढे ढाळघर फाटा- उणेगाव मार्गे गोरेगाव बाजारपेठ- लोणेरे अशी जाऊन पुढे या यात्रेच्या रॅलीचा नातेखिंड महाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक महाड याठिकाणी सायंकाळी 7 वाजता समारोप होणार आहे.
सावरकर गौरव यात्रेत देशभक्तांनी, युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन युवासेना प्रमुख विपूल उभारे यांनी केले आहे.