शिंग्रोबा देवाच्या उत्सवाचे आयोजन

| खोपोली | प्रतिनिधी |

खंडाळा घाटाचे जनक म्हणून ओळखले जाणाऱ्या वीर हुतात्मा शिंग्रोबा देवाचा उत्सव बुधवार दि.1 मे रोजी आयोजित करण्यात आला असून या उत्सवात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहावे, असे आवाहन शिंग्रोबा कमिटी देवस्थानचे संस्थापक बबन शेडगे यानी केले आहे.

खोपोली शहराच्या घाट माथ्यावर सह्याद्री पर्वत रांगेच्या कुशीमधील खंडाळ्या घाटातील वीर शिंग्रोबा देवाचे मंदिर आहे. हे अखंड धनगर समाजाचे दैवत आहे. तसेच, खंडाळा घाटाचे जनक म्हणून ओळखले जाणारे वीर हुतात्मा शिंग्रोबा देवाचा उत्सव दरवर्षी 1 मे रोजी मोठ्या उत्साहात पार पडतो. यामध्ये सकाळी महाअभिषेक, होमहवन, पूजा, भव्य पालखी मिरवणूक, मच्छिंद्र कुंभार यांचे कीर्तन, दुपारी हळदीकुंकू-सत्कार, महाप्रसाद, गजनृत्य, सायंकाळी आरतीने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

Exit mobile version