भाई कोतवालांच्या हौतात्म्यामुळे सावकारांच्या पाशातून मुक्तता

इतिहास संशोधक वसंत कोळंबे यांचे प्रतिपादन
। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यात हुतात्मा भाई कोतवालांनी परिवर्तनासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे. हे ओळखून कर्जत तालुक्यात शाळा सुरू केल्या आणि आपल्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला.तसेच सावकारीतून सुटलो,असे प्रतिपादन इतिहास संशोधक वसंत कोळंबे यांनी कर्जत येथे केले. वीर भाई कोतवाल यांच्या 109 व्या जयंतीचे आयोजन जयंती महोत्सवा समिती कर्जतच्यावतीने मराठी शाळेच्या सभागृहात आयोजन केले होते. इतिहास संशोधक वसंत कोळंबे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले. त्यानंतर हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी मराठा सेवा तालुकाध्यक्ष अनिल भोसले, नाभिक समाज तालुकाध्यक्ष दिलीप शिंदे, अखिल भारतीय ओबीक महासभा जिल्हाध्यक्ष भगवान धुळे, विजय कोंडीलकर आदी उपस्थित होते. रघुनाथ विभार आणि शशिकांत मंडलिक यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कर्जत तालुका आगरी संघटनेचे सह खजिनदार संतोष ऐनकर यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी कोळंबे पुढे म्हणाले की, भाई कोतवाल आणि त्यांच्या सहकार्‍यांनी जीवाची बाजी लावून इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. पूर्वी शिक्षणाचे साधन नव्हते त्यामुळे 1938 च्या पूर्वी तालुक्यात दहा टक्के लोक शिक्षित होते आणि नव्वद टक्के लोक अशिक्षित होते परंतु भाईनी 15 रुपये पगारावर सुरू केलेल्या शाळांवर तालुक्यातील शिक्षकांची नियुक्ती केली होती तसेच त्याकाळी सावकारांचा आपल्यासारख्या शेतकर्‍यांना खूप जाच होता परंतु त्याचाही मार्ग कोतवालांनी काढला. तिवणे येथे सावकार व शेतकर्‍यांची सभा घेवून त्यातून मार्ग काढला.फअसे कोळंबे यांनी सांगितले. राजेंद्र आढावा यांनी भाई कोतवालांच्या शैक्षणिक कार्याची माहिती सांगितली तर अनिल भोसले यांनी कोतवालांनी इंग्रजांबरोबर केलेल्या संघर्षाची माहिती विशद केली. समारंभाचे अध्यक्ष दिलीप शिंदे यांनी अध्यक्षीय भाषण केले. सूत्रसंचालन विजय कोंडीलकर यांनी केले. याप्रसंगी सिद्धार्थ ढोले, विशाल माळी, रमेश परिहार आदींसह नाभिक समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version