रवींद्र घरत, महेंद्र नाईक यांच्या हस्ते शुभारंभ
। चौल । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील चौलमळा येथे रविवारी (दि. 23) चौलमळा प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले आहे. गतवर्षीच्या यशस्वी आयोजनानंतर या क्रिकेट स्पर्धेचे यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. चौलमळा क्रिकेट संघातील खेळाडूंच्या संकल्पनेतून ही स्पर्धा चौल-पाझर येथील मैदानावर खेळविण्यात येणार आहे. गावातील तरुण पिढीमध्ये एकोपा व एकमेकांबद्दल जिव्हाळा राहावा, हीच या स्पर्धेमागची भावना आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन चौलमळा गावप्रमुख रवींद्र घरत, कृष्णादेवी युवक मंडळाचे अध्यक्ष महेंद्र नाईक यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. यावेळी गावचे उपप्रमुख जितेंद्र पाटील, भजन मंडळाचे अध्यक्ष तथा युवक मंडळ उपाध्यक्ष अल्पेश म्हात्रे, भजन मंडळ उपाध्यक्ष अंजेश घरत, महिला मंडळ अध्यक्षा प्रमिता पाटील, प्रतिष्ठित ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ही स्पर्धा चौलमळा गावापुरती मर्यादित असून, गावातील तरुणांचे आठ संघ सहभागी होणार आहेत.
आयपीएलच्या धर्तीवर प्रत्येक संघाची मालकी देण्यात आली आहे. त्यात महेंद्र नाईक संघमालक (सान्वी इलेव्हन), जितेंद्र पाटील संघमालक (साईसेवक), शैलेश नाईक संघमालक (काव्या-रुद्र चॅलेंजर्स), रवींद्र घरत संघमालक (अभि फायटर्स), मंदार नाईक संघमालक (अद्विक वॉरियर्स), सुनील घरत संघमालक (श्री माऊली केबल नेटवर्क), सचिन आमरे संघमालक (रिया टायगर्स), मोहन घरत संघमालक (वीर छावा) या संघांचा समावेश असणार आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजक चौलमळा क्रिकेट संघाचे अनिकेत म्हात्रे, जयेंद्र म्हात्रे, ओमकार पाटील, प्रणव पाटील, विशाल घरत, चिन्मय घरत, अभिषेक घरत यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य सहकारी मेहनत घेत आहेत. तरी, ग्रामस्थ, मुंबईकर ग्रामस्थ, युवक मंडळाचे कार्यकर्ते यांच्यासह क्रिकेटप्रेमींनी या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
असे असतील संघ
अभि फायटर्स: रवींद्र घरत (संघमालक), कर्णधार अभिषेक घरत, सुशांत पाटील, राजेंद्र पाटील, निकेश नाईक, काव्य मोरे, प्रित नाईक, अल्पेश म्हात्रे, प्रमोद ठाकूर, अवनीश म्हात्रे, शशिकांत म्हात्रे.
माऊली केबल नेटवर्क: सुनील घरत (संघमालक), कर्णधार प्रशांत आमरे, सुजित म्हात्रे, प्रशांत आमरे, जितेंद्र जाधव, पार्थ घरत, अमित पाटील,विघ्नेश म्हात्रे, महेंद्र घरत, विनय सातांबेकर, अभिजित नाईक, आयुष म्हात्रे, तुषार पाटील.
रिया टायगर्स: सचिन आमरे (संघमालक), कर्णधार विशाल घरत, साई लोके, तन्मय मोरे, दीपक लाड, विनीत थळकर, सोमेश आमरे, अमोल घरत, स्वप्नील थळकर, जयेश पाटील, मल्हार पाटील.
साई सेवक: जितेंद्र पाटील (संघमालक), कर्णधार जयेंद्र म्हात्रे, राहुल घरत, ओंकार पाटील, वेदांत लाड, सचिन म्हात्रे, सर्वेश पाटील, रवींद्र घरत, बाळकृष्ण पाटील, संकल्प म्हात्रे, प्रज्ञेश पाटील.
काव्या-रुद्र चॅलेंजर्स: शैलेश नाईक (संघमालक), कर्णधार साईप्रसाद पडवळ, चिन्मय घरत, सिद्धेश जाधव, रोहित खैरे, महेश घरत, ऋणीत घरत, राजेंद्र नाईक, महेश पाटील, सुदेश नाईक, रुद्र नाईक, राजेंद्र घरत.
वीर छावा: मोहन घरत (संघमालक), कर्णधार सार्थक, प्रणव पाटील, अंजेश घरत, जितेंद्र घरत, प्रज्ज्वल पडते, राजेंद्र ठाकूर, सुशांत शिवलकर, वंदेश लाड, आयुष म्हात्रे, सिद्धेश लोहार.
सान्वी इलेव्हन: महेंद्र नाईक (संघमालक), कर्णधार जितेंद्र नाईक, अनिकेत म्हात्रे, ओम आमरे, साक्षात म्हात्रे, विनीत सातांबेकर, अल्पेश घरत, निलेश मोरे, अनिल आमरे, आयुष नाईक, योगेश जाधव, मधुमित नाईक.
अद्विक वॉरियर्स: मंदार नाईक (संघमालक), कर्णधार मनीष नाईक, शुभम नाईक, मिलिंद मनोरे, राकेश लोहार, सिद्धेश म्हात्रे, वेदांत पाटील, निलेश म्हात्रे, संदीप घरत, श्रेयस म्हात्रे, अद्विक नाईक, आशिष म्हात्रे.