मुख्यमंत्री चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

| नागोठणे | वार्ताहर |

नागोठण्याजवळील मुरावाडी येथील जय बजरंग क्रिकेट क्लब मुरावाडीतर्फे एक लाख रूपयांचे पहिले बक्षिस व आकर्षक चषक असलेल्या भव्य अशा मुख्यमंत्री चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे दि. 9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील द्वितीय क्रमांक मिळविणार्‍या संघास 50 हजार तर तृतीय क्रमांक मिळविणार्‍या संघास 25 हजार रूपयांचे रोख पारितोषिक व चषक देण्यात येणार आहे. तसेच खेळाडूंवर मालिकावीर, सामनावीर, उत्कृ्ष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक अशी वैयक्तिक स्वरूपाच्या बक्षिसांची लयलूटही या स्पर्धेत करण्यात येणार आहे. मुरावाडी गावातील मैदानावर होणार्‍या या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी (दि.9) सकाळी 10 वा. मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या स्पर्धेत प्रथम येणार्‍या 24 संघांना प्रवेश देण्यात येणार आहे.

यातील पहिले दोन दिवस गाव ते गाव 16 संघ व शेवटच्या दिवशी 8 ओपन संघ खेळविण्यात येणार आहेत. या स्पर्धेत प्रवेश घेण्यासाठी रु. 8500 एवढे प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे. तर, आगाऊ 4 हजार रुपये देणार्‍या संघालाच स्पर्धेत नावनोंदणी करण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेच्या प्रवेशा संदर्भात अधिक माहितीसाठी प्रवीण ताडकर (मो.9970908506), नयन चोगले (मो.7875845673) व मंगेश ताडकर (मो.9112090209) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version