उरण | वार्ताहर |
जि.प.चे माजी अध्यक्ष,शेकाप नेते स्व.तुकाराम हरी वाजेकर यांची 41 वी पुण्यतिथी मंगळवारी ( 15 फेब्रुवारी) रोजी सकाळी 10 वाजता उरण पेठा मिठागर कामगार संघ कार्यालय कोटनाका उरण शहर येथे शेतकरी कामगार पक्षाचे नेते तथा विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात येणार आहे.
तसेच राजपाल नाका ते राघोबा मंदिर या मार्गाचे मतुकाराम हरी वाजेकरफ या नामफलकाचे अनावरण विद्यमान आमदार महेश बालदी यांच्या शुभहस्ते होणार आहे. उरणमधील सर्व जेष्ठ सभासद, नागरिकांनी या कार्यक्रमाला वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन उरण पेठा मिठागर कामगार संघटनेचे बा. ध. पाटील, उरण पेठा मीठ उत्पादक संघटनेचे महादेव बंडा यांनी केले आहे.