। खांब । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील खांब ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन दि.30 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. कृष्णा जाधव यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होणार्या या दिंडी सोहळ्याला बुधवारी (दि.30) सकाळी 7ः00 वाजता खांब येथील विठ्ठल मंदिरातून प्रारंभ होणार आहे. या दिंडी सोहळ्याचे मार्गदर्शक मारूती कोलाटकर, सदानंद जाधव, कृष्णाराम धनवी, अजय पारठे, प्रकाश थिटे, ज्ञानेश्वर लोखंडे, गणेश जाधव, एकनाथ मरवडे, शुभांगी महाडिक, राधिका लोखंडे आदींसह रामचंद्र जाधव, शांताराम महाडिक, देविदास भोईर, भरत कान्हेकर, लक्ष्मण भोसले, नथुराम जाधव, राम लोखंडे, काशिनाथ कान्हेकर मोलाचे सहकार्य करीत आहेत. ज्या भाविकांना या दिंडी सोहळ्यात सहभागी व्हायचे असेल त्यांनी आपले आधारकार्ड सोबत आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







