| अलिबाग | प्रतिनिधी |
गतवर्षी दि.7 नोव्हेंबर रोजी वंदे मातरम् गीताची 150 वर्ष पूर्ण झाली असून देश ‘वंदे मातरम्’ उत्सव साजरा करत आहे. वंदे मातरम् हे केवळ एक गीत नाही तर आत्मबल जागृत करणारा स्वातंत्र्याचा मंत्र आहे. आपण ब्रिटिशांपासून स्वतंत्र झालो तरी मानसिक गुलामगिरीतून मुक्त होणे अजून बाकीच आहे. स्वतंत्र संग्रामात अखंड भारताचा हा मंत्र समर्पण भावना, जागृती आणि देशप्रेमाची एक दिशा आहे. याच निमित्ताने येत्या 26 जानेवारीला ‘विचारांचा वर्ग’ या संवेदनच्या उपक्रमात राष्ट्रप्रेमाच्या इतिहासाला नव संजीवनी देत, विकसित भारताचे स्वप्न पाहणाऱ्या, विकसित होऊ पाहणाऱ्या नागरिकांसाठी एक खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून अलिबाग तालुक्यातील बेलकडे फाट्याजवळील नेहा मीलन बंगलो येथे होणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.







