महावाचन उत्सव कार्यक्रमाचे आयोजन

। सुकेळी । वार्ताहर ।

नागोठणेजवळच असलेल्या गी.द. तटकरे हायस्कूल ऐनघर-कानसई यांच्या वतीने मराठी राजभाषा गौरव दिन मंगळवारी (दि.27) उत्साहात साजरा करण्यात आला. या गौरवदिनानिमित्त ऐनघर पंचक्रोशीतील प्राथमिक व माध्यमिक शाळांचे महावाचन उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच कलावती कोकळे यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी कानसई शाळेत मुलांना वाचनाची गोडी लागावी व त्यांना एक चांगळे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी पहीली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचा व आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे असे दोन गट करुन पुस्तक वाचन घेण्यात आले. यामध्ये प्रथम आलेल्या तीन क्रंमांकांना बक्षिसे देण्यात आली. ही बक्षिसे सरपंच कोकळे यांनी उपलब्ध करून दिली. कार्यक्रमाला प्रज्वली भोईर, राजेंद्र कोकळे, महेंद्र ढाणे, पुनम ढाणे, भरत भोईर, अनिल वाघ, शिक्षक निळेश बिरगावले, शैलेश गजभर, स्नेहल पाटील, मनिषा पाटील, बाळासाहेब चिंचोले, मोनिका लांबाळे, हिरामण दोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version