विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन

| तळा | वार्ताहर |

रायगड पोलीस अधीक्षक कार्यालय अलिबाग यांच्या वतीने तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे गो म वेदक विद्यामंदिर तळा येथे पोस्टर स्पर्धा तर कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या पोस्टर स्पर्धेत इयत्ता सातवी ते दहावी पर्यंतचे 26 विद्यार्थी सहभागी झाले होते. या पोस्टर स्पर्धेत अंश कोलवणकर प्रथम, जान्हवी साळवे द्वितीय तर संस्कृती कांबळेकर हिने तृतीय क्रमांक पटकावला. ज्युनियरकॉलेजने आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत रितेश नागे प्रथम, जयश्री काप द्वितीय तर श्रुती ठाकूर हिने तृतीय क्रमांक पटकावला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कराड, संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत रोडे, पुरूषोत्तम मुळे, मंगेश देशमुख, महेंद्र कजबजे, किरण देशमुख, श्रीराम कजबजे, दिलीप ढाकणे, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन केले.

Exit mobile version