गोखले महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन

। श्रीवर्धन । प्रतिनिधी ।
श्रीवर्धन येथील गोखले महाविद्यालयात स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये खो-खो व कबड्डी या खेळांचा समावेश होता. प्राचार्य डॉ. श्रीनिवास जोशी यांच्या हस्ते स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी प्रा.नवज्योत जावळेकर यांनी प्रास्ताविकेत महाविद्यालयाच्या क्रीडाक्षेत्राचा आढावा घेतला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रांगणात क्रीडाज्योत फिरविली. स्पर्धांमध्ये मुला-मुलींचे एकूण आठ संघ सहभागी झाले होते. स्पर्धा पार पडण्यासाठी प्रा.नवज्योत जावळेकर यांनी नियोजन केले होते. तसेच प्रा.मृण्मयी भुसाणे, प्रा.वैशाली सावंत, प्रा.उल्हास खोपकर, प्रा.राजश्री लोहार, प्रा.दाभिलकर, प्रा.स्वाती शिंदे, प्रा.पानसरे, प्रा.चित्ते आदिंनी वनाधिकारी, गुणलेखकाची बाजू सांभाळली. या सर्व कार्यक्रमांसाठी विकास समितीचे सदस्य सर्वश्री शांतीलाल जैन, राजेंद्र भोसले, नितीन सुर्वे यांनी शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version