माथेरानमध्ये विविध स्पर्धेचे आयोजन

| माथेरान | वार्ताहर |

महिला मुलींना समाज कार्याच्या आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी क्षत्रिय मराठा महिला समाज कार्यकारणीने दिवाळीच्या सणामध्ये महिलांसाठी रांगोळी, दिवाळी फराळ आणि किल्ले स्पर्धा आयोजित केल्या होत्या. सोशल मीडियावर मध्यमातून स्पर्धेत सहभागी होण्याची आव्हान केले होते.

रांगोळी स्पर्धेत महिला गट व युवती गट असे दोन गटांत ही स्पर्धा घेण्यात आली होती यात प्रथम सुहासिनी शिंदे, द्वितीय अश्विनी तांबे, तृतीय शिवानी शिंदे व साक्षी ढेबे तर पौर्णिमा कदम व नताशा मोरे, वनिता दिघे यांना उतेजनार्थ बक्षीस देण्यात आली. दिवाळी फराळ स्पर्धेत प्रथम क्रमांक अर्चना कदम, द्वितीय कुंदा निचींदे तर तृतीय क्रमांक वर्षा शिंदे, लक्ष्मी सोनावणे तसेच दहा उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. लहान मुलांसाठी किल्ला स्पर्धेमध्ये प्रथम तनिष्का सुतार, द्वितीय सोहम तांबे, तृतीय क्षितिज मोरे, व आर्या ढेबे यांना देण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मराठा महिला समाज कार्यकारणी अध्यक्षा प्रतिभा घावरे, स्नेहा शिंदे, श्रुतिका दाभेकर, सोनम दाभेकर, कल्याणी शिंदे आणि महिला पुरुष मंडळींनी विशेष परिश्रम घेतले.

Exit mobile version