वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

। माणगाव । प्रतिनिधी ।

रायगड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य समिती सभापती व शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अँड. राजीव अशोक साबळे यांचा वाढदिवस रविवार दि.7 जुलै रोजी विविध सामाजिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार असल्याची माहिती कृष्णा गांधी, नरेंद्र गायकवाड व नितीन बामगुडे यांनी सहविचार सभेत बोलताना दिली.

यावर्षी अ‍ॅड. राजीव साबळे हे 60 व्या वर्षात पर्दापण करीत असून माणगाव शिक्षण प्रसारक मंडळ, अ‍ॅड. राजीव साबळे मित्रमंडळ व साबळे परिवारातर्फे हा वाढदिवस सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी माणगाव येथील द.ग. तटकरे महाविद्यालयात केइएम रुग्णालय रक्तपेढी परेल व शासकीय रुग्णालय रक्तपेढी अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून किमान 500 ते 600 रक्त बॅगा संकलित करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. तसेच, माणगाव नगरपंचायत हद्दीत ठिकठिकाणी वृक्षारोपणाचा मोठा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून प्रत्येकाने आपल्या घरी वृक्षाची लागवड करून त्याचा फोटो काढून अँड. राजीव साबळे यांना पाठवल्यास तीच खरी मला शुभेच्छा असेल, अशी प्रतिक्रिया अ‍ॅड.साबळे यांनी यावेळी दिली.

Exit mobile version