। पनवेल । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्ष तळोजा फेज दोनच्या अध्यक्षा दिलीप जाधव आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील, प्रसाद ढगे पाटील, जयेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (दि.2) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोकण शिक्षक मतदार संघाचे मा. आ. बाळाराम पाटील यांना राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र विधान मंडळाच्यावतीने उत्कृष्ट भाषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी साई ब्लड बँक यांच्यावतीने भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 103 लोकांनी रक्तदान केले. याचबरोबर भीमा चव्हाण यांच्यामार्फत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रामुख्याने यामध्ये मधुमेह, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, थायरॉईड आदींची तपासणी करण्यात आली. पनवेलमधील नामकीत संस्था आर.आर. झुंजूनवाला आय हॉस्पिटलच्यावतीने मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. तसेच, ज्या रुग्णांना चष्म्याची गरज आहे त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. तळोजामधील महिला बचत गटांना मोफत महिला उद्योग शिबिराचेदेखील आयोजन करण्यात आले होते. यावेळी नामांकित व्यक्तींनी त्यांना वेगवेगळ्या व्यवसायाबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी पनवेल विधानसभा अध्यक्ष काशिनाथ पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण शेठ घरत, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील, पनवेल काँग्रेसचे अध्यक्ष सुदाम पाटील, माजी आमदार दत्तूशेठ पाटील, शिक्षण संस्थेचे सीईओ रा.गो. पाटील, महाराष्ट्र राज्य वारकरी संप्रदायाचे पुंडलिक महाराज फडके आदी मान्यवर उपस्थित होते.
पनवेलमध्ये शेकापचे विविध कार्यक्रम
