माघी गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन


| गोवे-कोलाड | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील घोसाळे येथे श्री. गणपती ट्रस्ट मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे याहीवर्षी मिती माघ शु. चतुर्थी शके 1945, मंगळवार (दि.13) माघीगणेश जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. याप्रसंगी धार्मिक तथा आध्यत्मिक तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाला सहकुटुंब सहपरीवार गणेश दर्शनास येऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री गणपती ट्रस्ट मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. श्री गणपती ट्रस्ट घोसाळे ता. रोहा, जि. रायगड यांच्या वतीने ‘आम्ही चालऊ पुढे वारसा’ या अनुषंगाने सोमवार 12 फेब्रुवारी रोजी निबंध आणि चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, नृत्याविष्कार कार्यक्रम होणार आहेत. तर मंगळवार 13 फेब्रुवारी रोजी श्रीगणेश अभिषेक, भजन, हळदीकुंकू, श्रीगणेश जन्म, श्रींची महाआरती, महाप्रसाद, विद्यार्थी गुणगौरव व मान्यवरांचा सत्कार सोहळा तसेच स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण रांगोळी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.

Exit mobile version