तळ्यात रानभाजी महोत्सवाला सुरुवात
तळा । वार्ताहर ।
तळा येथे महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्यातर्फे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर व चंद्रकांत रोडे यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले. महोत्सवामध्ये तालुक्यामध्ये उपलब्ध होणार्या जवळपास 35 प्रकारच्या रानभाज्या प्रदर्शित करण्यात आल्या. तसेच प्रत्येक रानभाजीचे असणारे महत्व व आरोग्यासाठी असणारे फायदे याची सविस्तर माहितीचे फलक लावण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी कृषी अधिकारी सुरेश पाटील, अस्मिता भोरावकर, मंगेश शिगवण, जयेश गोळे, प्रकाश गायकवाड, पोलीस उप निरीक्षक एस.एस.खराडे, तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे, सुनील गोसावी सचिन जाधव, सचिन लोखंडे, कृषी सहाय्यक श्री.पाडगे, श्री.पाशिमे, पुरुषोत्तम मुळे, नथुराम अडखले, चंद्रकांत भोरावकर, भास्कर गोळे, मधुकर वारंगे, श्री.चांदोरकर, श्री.बाबर, श्री,पुरी, श्री,साळूके, श्री.कोळी, श्री,दुधाटे, श्रीम.नागुरे व शेतकरी मोठया प्रमाणात उपस्थित होते.
खोपोलीत रानभाजी महोत्सवास प्रतिसाद
आदिवासी दिनाचे औचित्य साधत तालुका कृषी अधिकारी यांनी आत्मा योजने अंतर्गत रानभाजी महोत्सवाचे आयोजन केले होते. खोपोली पोलीस ठाण्याच्या प्रांगणात भरविलेल्या या महोत्सवास लोकांनी प्रतिसाद देत 8 ते 10 हजार रूपयांची रानभाज्यांची खरेदी केली आहे महोत्सवाचे उद्घाटन खोपोली ठाण्याचे पोलीस निरिक्षक शिरीष पवार यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी सुभाष मुंडे, अर्चना सुळ,अनु पिरकट, जागृती महिला बचत गट आडोशी,जिजाबाई ग्रामसंघ, ज्ञानदीप महीला बचत गट आडोशी, विठ्ठल रामा वाघमारे,विष्णु पवार, शोभाताई काटे, देशमुख, भणगे,शिंदे, धुमाळ तसेच कृषि सहाय्यक राठोड, महाडिक,आंधळे,भोमे,फराटे,चौधरी,पाटील,माने,सारंग,रांजुण, शिंदे, प्रज्ञा पाटील उपस्थित होते. महोत्सवात करंटोळी, कुर्डू, भारंगी, अलु, सुरण, टाकळा, गुळवेल,शेवगा,केळफुल, लालमाठ,ओळ्याची पाने ,कपाळफोडी,दिंडा, आंबुशी, कवळा, काटेमाठ आदि प्रकारच्या भाज्या ठेवल्या होत्या. शहरातील लोकांनी प्रतिसाद देत 8 ते 10 हजार रूपयांची रानभाज्यांची खरेदी केली आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंडळ कृषी अधिकारी खालापूर जे. के. देशमुख यांनी केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन आणि यशस्वी करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकारी सर्व कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
