संशोधनातून नवीन वाणाची उत्पत्ती

शिहू येथील शेतकर्‍याचा कौतुकास्पद प्रयोग
| शिहू | वार्ताहर |
परंपरागत पद्धतीला नावीन्यपूर्ण प्रयोग आणि संशोधनाची जोड दिली तर शेती हा भरघोस उत्पन्न देत असल्याचे दाखवून देणार्‍या शिहू येथील शेतकरी केशव म्हात्रे यांनी एक अनोखे संशोधन करून नवीन भाताचे वाण तयार केले आहे. एरवी भाताच्या कणसाला 200 ते 250 इतके दाणे असतात; परंतु संशोधन पूर्ण तयार केलेल्या कणसाला 500 ते 550 इतके दाणे आहेत. आपला देश हा कृषीप्रधान देश आहे.

केवळ शासनावर अवलंबून न राहता केशव म्हात्रे यांनी आपल्या शेतात वाडा कोलम व प्रसन्न या जातीच्या रोपांची लागवड केली होती. त्यातून त्यांनी फुलोर्‍याच्या वेळेला प्रसन्न आणि कोलम रोपांचे परागीकरण करून एक नवीन वाण तयार केले. यावर्षी त्या पिकाची लागवड शेतात केली असून, प्रत्येक कणसामागे 500 ते 550 दाणे आले आहेत. त्यांच्या या कर्तृत्वाची दखल घेत पेण तालुका कृषी अधिकारी लोकरे व त्यांचे सहकारी यांनी पाहणी करून प्रयोगशील शेतकरी केशव म्हात्रे यांचे कौतुक केले आहे. यावेळी विजय पाटील व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Exit mobile version