ब्रिस्बेन इंटरनॅशनलमध्ये तमाराला हरवले
| रायगड । प्रतिनिधी ।
जपानची नाओमी ओसाकाने आई झाल्यानंतर टेनिसमध्ये पुनरागमन केले आहे. ऑस्ट्रेलियन ओपनपूर्वी सोमवारी ब्रिस्बेन इंटरनॅशनलमध्ये तिने पहिला सामना जिंकला. हंगामातील पहिले ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपनची तयारी करण्यासाठी खेळाडू 15 जानेवारीपासून सुरू होणार्या हॅप्पी स्लॅमच्या आधी फॉर्म मिळविण्यासाठी ब्रिस्बेन इंटरनॅशनलमध्ये सहभागी होतात. जपानच्या नाओमी ओसाकानेही ब्रिस्बेन येथील टेनिस कोर्टवर धाव घेतली आहे.
ओसाकाने ब्रिस्बेन इंटरनॅशनलमधून पुनरागमन केले आणि तेही विजयासह. ओसाका 15 महिन्यांनंतर कोर्टवर आली आणि तिने सलग सेटमध्ये विजय मिळवला. तिने जर्मनीच्या तमारा कोरपाशचा 6-3, 7-6 असा पराभव केला. आता ओसाकाचा सामना 16 व्या मानांकित झेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोव्हाशी होणार आहे. ओसाकाने पहिला सेट सहज जिंकला होता. दुसर्या सेटमध्ये ती जर्मन खेळाडूविरुद्ध 5-3 अशी सर्व्हिस करत होती, पण सर्व्हिस गमावली.
हा सेट टायब्रेकरमध्ये गेला, ज्यामध्ये ओसाकाने 7-6 (9) असा विजय मिळवला आणि सामना जिंकला. ओसाका 2021 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन बनली. त्यानंतर अनेकवेळा मानसिक आरोग्यामुळे ब्रेक घेतला. गतवर्षी ती गरोदरपणामुळे कोर्टापासून दूर होती.
ओसाका म्हणाली की, आई झाल्यानंतर तिला अधिक मोकळे आणि मजबूत वाटू लागले आहे. 26 वर्षीय ओसाका म्हणाली, ’जुलैमध्ये शाईला जन्म दिल्यानंतर मी अधिक मोकळ्या मनाची, धीराची आणि आत्मविश्वासू बनली आहे. मला मानसिकदृष्ट्या मजबूत वाटते. गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. पूर्वी मी आजूबाजूच्या वातावरणापासून दूर राहण्यासाठी हेडफोन वापरायचो, पण आता मी ते करणं बंद केलं आहे. मी यापूर्वी इतर खेळाडूंशी संवाद साधला नाही. मी स्वतःभोवती एक प्रकारची भिंत बांधली होती. पण आता मी लोकांशी बोलण्यासाठी पुढाकार घेते.







