। नागोठणे । वार्ताहर ।
बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्यावतीने शनिवारी नागाठण्यात आंदोलन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना (उबाठा) जिल्हा सहसंपर्कप्रमुख किशोरशेठ जैन म्हणाले की, उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर करून आम्ही काळे झेंडे हतात घेऊन आणि काळी पट्टी बांधून आंदोलन करून या सरकारचा निषेध करीत आहोत. तसेच, हा निषेध पोलीस खात्यामार्फत सरकारपर्यंत नक्कीच पोहचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नागोठण्यातील छ. शिवाजी महाराज चौकात हाताला काळ्या फिती लावून जाहीर निषेध व्यक्त करतेवेळी जैन बोलत होते.
यावेळी मविआचे संजय भोसले, अशपाक पानसरे, बिलाल कुरेशी, अखलाक पानसरे, धनंजय जगताप, अनिल महाडिक, ज्ञानेश्वर साळुंखे, प्रकाश कांबळे, संतोष नागोठणेकर, अमृता महाडिक, ज्योती राऊत, भाविका गिजे, शहनाज अधिकारी, मोहन नागोठणेकर, इम्रान पानसरे, समीर भिकन, बाळु रटाटे, सतीश पाटील, गुडु पानसरे, हुसेन पठाण, प्रशांत भोईर, प्रणिता पत्की, जितेंद्र जाधव, ऋत्विज माने, जोहेब कुरेशी, इक्बाल पानसरे, बालम मुजावर, नजिर सय्यद, भरत गिजे, दामोदर नागोठणेकर, पुरूषोत्तम घाग, सुरेश कांबळे, रूपेश जगताप आदींसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.