अधिसंख्य निवृत्त कर्मचारी उपोषणकर्त्यांपैकी चारजणांची प्रकृती खालावली

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनुसूचित जमातीच्या अधिसंख्य निवृत्त कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. त्यापैकी चारजणांची प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात दोन महिलांचा समावेश आहे.

26 सप्टेंबर2022 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास तीस आंदोलक बसले आहेत. त्यापैकी मच्छिन्द्र माया सिद्धी (वय 61 वर्षे,राहणार-थेरोंडा-आगलेची वाडी), वसंत रघुनाथ बंदरी (वय 61 वर्षे कोळीवाडा), चंद्रकांत मारुती कोळी (वय 60 वर्षे ,पेण) , गीतांजली गोरखनाथ भाटे (वय 61वर्षे,राहणार कोर्लई,तालुका-मुरूड)वासंती विद्या वेताळ( वय 60वर्ष), वंदना अविनाश शिणे(वय 61 वर्षे,)(दोघेही राहणार बोर्ली,तालुका मुरूड) यांची प्रकृती खालावल्याने वैद्यकीय पथकास पाचारण केले केले होते.

वैद्यकीय तपासणीमध्ये मच्छिन्द्र माया सिद्धी, चंद्रकांत मारुती कोळी, वासंती विद्या वेताळ (वय 60वर्ष), वंदना अविनाश शिणे (वय 61 वर्षे,)(दोघेही राहणार बोर्ली,तालुका मुरूड) या चारजणांची प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

Exit mobile version