जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक

8 दिवसांत रुग्ण दर 2.47 वरुन 16.52 वर
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, जिल्ह्यात 2 जानेवारी दरम्यान करण्यात आलेल्या आरटीपीसीआर चाचाण्यांपैकी 16.52 टक्के जणांना कोरोना विषाणूची लहान झाल्याचे निष्पन्न झाले आहे, विशेष म्हणजे 8 दिवसांपूर्वी 26 डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये 2.47 टक्के नागरिकांना कोरोनाची लागन झाल्याचे निष्पन्न झाले होते. न रायगड जिल्हा कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या उंबरठ्यावर उभा आहे. जिल्ह्यात मोठ्या संख्येने रुग्ण सापडू लागले आहेत. 26 डिसेंबर ते 2 जानेवारी या आठ दिवसांमध्ये जिल्ह्यात तब्बल 980 कोरोना रुग्ण सापडले आहेत. ही आकडेवारी चिंताजनक असून, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे, नागरिकांनी सरकारने सुचविलेल्या सूचना तसेच निबंधाचे पालन करावे, असे आवाहन डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
जिल्ह्यातील 94.87 टक्के नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेतला आहे. यामधील 70.62 टक्के नागरिकांनी लसीचे दोनही डोस घेतले आहेत. 3 जानेवारीपासून सरकारने 15 ते 18 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण हाती घेतले आहे. त्यामुळे 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसह 18 वर्षांवरील ज्या नागरिकांनी लसीचा डोस घेतला नाही त्यांनी त्वरित लसीचा डोस घेणे गरजेचे असल्याचे मतही डॉ. किरण पाटील यांनी व्यक्त केले.


नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घ्यावा, सोशल डिस्टसिंगचे नियम पाळणे, तोंडाला मास्क लावणे, सॅनिटाईझरने वारंवार हात निर्जंतूक करावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
डॉ. किरण पाटील- मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

दिनांक – कोरोना रुग्ण – पॉझिटिव्ह टक्केवारी
26/12/2021 – 48 – 2.47
27/12/2021 – 32 – 4.00
28/12/2021 – 48 – 4.86
29/12/2021 – 88 – 4.79
30/12/2021 – 101 – 11.39
32/12/2021 – 185 – 6.86
1/1/2022 – 196 – 11.69
2/1/2022 – 288 – 16.52

Exit mobile version