संतापजनक! विधी संघर्षित बालकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

। रेवदंडा । प्रतिनिधी ।

रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी विधी संघर्षित बालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 1 जानेवारी 2026 ते 31 मार्च 2026 या कालावधीत तक्रारदार यांच्या अल्पवयीन व अज्ञान मुलीचा गैरफायदा घेत, विधी संघर्षित बालकाने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. या घटनेत पीडित मुलगी गर्भवती झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version