उत्कृष्ट अंगणवाडी पुरस्कार सोहळा

। सोगाव । वार्ताहर ।

दी लाईफ फाऊंडेशन तसेच एकात्मिक बाल विकास प्रकल्प अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अलिबाग येथे शनिवार दि.30 मार्च रोजी उत्कृष्ट अंगणवाडी पुरस्कार सोहळा साजरा करण्यात आला.

यावेळी राजिप मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, निर्मला कूचिक, गीतांजली पाटील, विजय मयेकर, रेखा सहानी, शालिनी मखीजा, विनोद लाला, अजित लालवानी, महेश माखीजा, उल्का कुलकर्णी, विनोदिनी मोकल, भाग्यश्री पाटील, सामिया पेरेकर, दीप्ती मोकल, कल्पिता साळावकर, शिलानंद इंगळे, पल्लवी राणे, प्रणय ओव्हाळ, राखी राणे, प्रियांका शिंदे, मुस्कान शेख, योजना शितोळे, प्रदीप दबळे, स्वप्नाली, प्रदीप पाटील, अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी तेजस्विनी फाउंडेशनच्या अध्यक्षा जीविता पाटील यांनी अंगणवाडी सेविकांसाठी चांगला उपक्रम आयोजित केल्याबद्दल अध्यक्षा पुनम लालवानी यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच आयसिडीएस प्रकल्प अधिकारी गीतांजली पाटील यांनी देखील आयसिडीएस विभागातर्फे अध्यक्षा पुनम लालवानी तसेच सिईओ सत्यजित बडे, डीवायसिईओ निर्मला कुचिक यांचे विशेष आभार मानले. दी लाईफ फाऊंडेशनचे रायगड जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक शिलानंद इंगळे यांनी आपल्या प्रास्ताविकात दी लाईफ फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील लोकांसाठी सामाजिक हिताची जाणीव ठेवून राबविण्यात येणार्‍या सामाजिक उपक्रमांबद्दल माहिती दिली व या आयोजित कार्यक्रमाचा हेतू हा अंगणवाडीतील मुलांचे आरोग्य सुधारण्यासाठी तसेच शैक्षणिक साहित्य आणण्यासाठी फाऊंडेशनच्या माध्यमातून खारीचा वाटा उचलून मदत करणे हा असल्याचे सांगितले.

Exit mobile version