ऑक्सिजन पार्कने घेतला मोकळा श्वास

झाडांच्या बाजूच्या गवताची केली सफाई

| उरण | वार्ताहर |

सारडे विकास मंचच्या संकल्पनेतून साकार झालेलं कोमणादेवी ऑक्सिजन पार्कमधील गेली 10 वर्षें झाडांची लागवड आणि त्यांचं संगोपन अगदी प्रामाणिक प्रयत्न केला जात आहे. यावर्षीदेखील दीपावली अगोदरच झाडांच्या बाजूला वाढलेल्या भरमसाठ गवताची सफाई ग्रास कटरच्या सहाय्याने करण्यात आली. यासाठी अनेक निसर्गप्रेमींचे मोलाचं सहकार्य लाभले आहे. यात इंटरपोर्ट ग्लोबल लॉजिस्टीक्स प्रा. लिमिटेडचे इम्पोर्ट मॅनेजर अमोल तेली, आदर्श शिक्षक उपेंद्र ठाकूर, सदानंद पाटील, शक्ती वर्तक, सुरेश जाधव यांनी आपल्या वाढदिवसानिमित्ताने दिलेली आर्थिक मदत ही या कार्यासाठी वापरण्यात आली आहे.

निसर्गसंवर्धन ही काळाची गरज ओळखून अनेक सामाजिक संस्था सहकार्याचा हात पुढे करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने कोकण कट्टा मुंबई, अजित पितळे, चित्रकार रुपेश पाटील, साई कृपा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कोप्रोली, सदाबहार दोस्ती ग्रुप, सुयश क्लासेस आवरे, श्री नंदाई प्रतिष्ठान वशेणी, अशा सर्वांच्या सहकार्याने झाडांच्या बाजूला वाढलेल्या गवताची सफाई करण्यात आली. सोबतच कापलेले हे गवत महिला मजुरांतर्फे एकत्र बाजूला करून झाडांना वणव्यापासून वाचविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. यासाठी या 12 दिवसांत 25 लीटर पेट्रोल, ग्रास कटर ऑपरेटरची मजुरी 4800, कापलेलं गवत एकत्रित करण्यासाठी महिला मजुरांची मजुरी 1000 असे एकंदरित 10 हजार रुपये खर्च या सफाईसाठी करण्यात आला. ग्रास कटर ऑपरेटर निशिकांत दादा गावंड यांनी आपल काम चोख बजावले आहे. असंख्य निसर्गप्रेमींच या कार्यात मध्ये मोलाचं सहकार्य लाभलं आहे. या सर्व निसर्गप्रेमींचं सारडे विकास मंच अध्यक्ष आणि कोमणादेवी ऑक्सिजन पार्कचे निर्माते नागेंद्र म्हात्रे यांनी आभार व्यक्त केले आहेत.

Exit mobile version