जिल्हाधिकारी किशन जावळे यांची माहिती
| रायगड | प्रतिनिधी |
किमान आधारभूत किंमत धान खरेदी योजनेंतर्गत दि.महाराष्ट्र स्टेट को-ऑप मार्केटिंग फेडरेशन मुंबई यांच्यामार्फत जिल्हा पणन अधिकारी, रायगड यांच्या अखत्यारीत असलेल्या धानखरेदीदार संस्थांमार्फत 46 खरेदी केंद्रावर खरीप व रब्बी पणन हंगाम 2025-2026 करिता धानाची (भाताची) खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्याकडील शासन निर्णयान्वये भात खरेदीचा धान-खरीप पणन हंगाम कालावधी दि.03 नोव्हेंबर 2025 ते दि.31 मार्च 2026, तर भरडधान्य खरीप पणन हंगाम कालावधी दि.01 डिसेंबर 2024 ते दि.28 फेब्रुवारी 2026 असा असणार आहे. तर रब्बी पणन हंगाम केंद्र शासनाकडून प्राप्त सूचनांनुसार राहणार आहे.
भात खरेदीच्या वेळी शेतकऱ्यांनी आपल्याकडील जमिनीबाबतचा 7/12 चा उताऱ्याची व गाव नमुना 8(अ) ची छायाकिंतप्रत खरेदी केंद्रावर धान विक्रीकरिता आणणे आवश्यक आहे. या उताऱ्यातील धान्य व धानाखालील क्षेत्र पाहून धान/भरडधान्य खरेदी करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या 7/12 उतारानुसार पीकाखालील क्षेत्र,या वर्षीची पीक परिस्थिती (पैसेवारी), पीकाचे सरासरी उत्पादन या सर्व बाबी विचारात घेऊन, धान/भरडधान्य खरेदी करण्यात येणार आहे.
धानाची खरेदी ही ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने संबधित शेतकऱ्यांची नोंदणी करणे आवश्यक राहील. याकरिता खरेदी केंद्रावर भात विक्रीकरिता आणताना प्रत्येक शेतकऱ्यांनी सोबत आपल्या आधारकार्डाची तसेच बँकेच्या पासबुक आणणे आवश्यक आहे. तसेच रोज सायंकाळी खरेदी केंद्र बंद झाल्यानंतर खरेदी केंद्रांवर आणलेले, परंतु खरेदी न झालेले धान/ भरडधान्य सांभाळण्याची जबाबदारी संबधित शेतकऱ्यांचीच राहणार आहे.
भात खरेदी केंद्राची ठिकाणे व त्यास जोडलेली गावे यांची माहिती जिल्हा पणन अधिकारी रायगड संबंधित तहसिलदार/ गट विकास अधिकारों पंचायत समिती तसेच उप अभिकर्ता म्हणून काम करणाऱ्या सह. संस्था/ खरेदी विक्री संघ/सह.भात गिरणी यांच्याकडे उपलब्ध राहणार आहे.
अलिबाग तालुक्यातील शिरवली येथील भुवनेश्वर सहकारी भात गिरणी लि., नांगरवाडी मालाडे येथील नवजीवन शेती अभिनव सेवा सह.संस्था लि., झिराड येथील अलिबाग तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि., रामराज येथील विरेश्वर शेतकरी लाभार्थी सामाईक संयुक्त शेती सहकारी संस्था लि., चोंढी येथील किहीम विभाग सहकारी भात गिरणी लि., रेवदंडा आणि बोर्ली मांडला येथील दत्तकृपा भाजीपाला सह.संस्था मर्या.पेण तालुक्यातील पेण,बोर्झे,वडखळ, कामार्ली,वढाव, वरसई पेण तालुका सहकारी ख.वि.संघ लि. पेण, शिर्कीचाळ येथील अदिती ऑग्रो प्रोडयुसर कं.लि.पनवेल तालुक्यातील मार्केटयार्ड पनवेल-1 येथील पनवेल सहकारी भात गिरणी लि., खालापूर तालुक्यातील चौक व खालापूर येथील नेताजी सह.भात गिरणी लि.,कर्जत तालुका शेतकरी सह.खरेदी विक्री संघ लि. दहिवली, वैजनाथ, कडाव, कशेळे येथील कशेळे सहकारी भात गिरणी लि., कर्जत तालुक्यातील नेरळ येथील नेरळ विविध कार्यकारी सेवा सोसायटी लि.,सुधागड तालुक्यातील सुधागड तालुका खरेदी विक्री संघ, परळी, पाली, पेडली,नाडसूर, बल्लाळेश्वर नाविन्यपूर्ण सर्व सेवा सहाकारी संस्था बी पाली,सुधागड शेतकरी उत्पादक सहकारी संस्था लि.वाघोशी, श्रीराम ना.वि.सर्व सेवा सह.संस्था झाप. रोहा तालुक्यातील भैरवनाथ दूध उत्पादक सहकारी संस्था लि., यशवंतखार, रोहा, कोलाड आणि चणेरा व मारुती प्रसाद भाजीपाला सहकारी संस्था लि.शेणवई, मेढा,श्रीवर्धन तालुक्यातील रानिवली वि. का. सेवा सहकारी सोसायटी लि. रानवली, सायगाव, बोर्ली. माणगाव तालुक्यातील माणगाव, चांदोरी तळेगाव, ता.शेतकरी सह खरेदी विक्री संघ लि., महाड तालुक्यातील महाड तालुका शेतकरी सहकारी ख.वि.संघ लि., पोलादपूर तालुक्यातील पोलादपूर तालुका सहकारी ख.वि. संघ लि.मु.पो.पोलादपूर आणि देवळे येथील दत्तकृपा महिला औ.उ. सहकारी संस्था लि. व म्हसळा तालुक्यातील म्हसळा ता. सह.खरेदी विक्री संघ लि.मु.पो.म्हसळा अशा एकूण 46 केंद्रांना पणन हंगाम 2025-2026 मधील धान खरेदीकरिता मंजूरी देण्यात आली आहे , असे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले.
धानाच्या आधारभूत किंमती
भात सर्वसाधारण-2 हजार 369 रुपये प्रति क्विंटल व शेतकऱ्यांना 2 हजार 369 रूपये प्रति क्विंटल रक्कम अदा करण्यात येईल. भात (अ ग्रेड)- 2 हजार 389 प्रति क्विंटल व शेतकऱ्यांना 2 हजार 389 रूपये प्रति क्विंटल रक्कम अदा करण्यात येणार आहे.







