| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावर्षी तब्बल 131 जणांना पद्म पुरस्काराने गैरवण्यात येणार आहे. ज्यामध्ये 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. कला, समाज सेवा, उद्योग, विज्ञान, वैद्यकशास्त्र आणि खेळ अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना पद्म पुरस्काराने गैरवण्यात आले आहे. ज्यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत, अशा व्यक्तींना राष्ट्रपती भवनात आयोजित खास कार्यक्रमामध्ये हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यावेळी धर्मेंद्र सिंह देओल यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच, केटी थॉमसन, एन. राजम, पी. नारायण आणि व्ही. एस. अच्युतानंदन यांनादेखील पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर, अलका याज्ञिक, भगतसिंग कोश्यारी, कल्लीपट्टी रामासामी पलानीस्वामी, मामूट्टी, डॉ. नोरी दत्तात्रेयडू, पियुष पांडे, एस.के.एम. मैलानंदन, शतावधानी आर. गणेश, उदय कोटक, व्ही.के. मल्होत्रा, वेल्लापल्ली नटेसन, विजय अमृतराज, शिबू सोरेन यांना पद्मभूषण पुरस्कार जाहिर झाला आहे. तसेच, देशातील विविध राज्यांतील एकूण 113 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहिर झाला आहे.







