| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड पद्मदुर्ग जागर व संवर्धन समिती तसेच कोकण कडा मित्र मंडळ रायगड यांच्या वतीने उद्या रविवारी (दि.15) करण्यात आले आहे. तरी गड स्वच्छता, साफसी सफर, पारंपरिक गोंधळ-लोकनृत्य, शिवव्याख्यान पोवाडे, पद्मदुर्ग दर्शन घेण्यासाठी शिवमावळ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुरुड पद्मदुर्ग जागर व संवर्धन समिती अध्यक्ष आशिल ठाकूर यांनी केले.
मुरुड समुद्र किनार्यापासून तीन किलोमीटर अंतरावर राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी खोल अरबी समुद्रात ऐतिहासिक पद्मदुर्ग किल्ला बांधला आहे. किल्ल्यावर स्वच्छता राहावी व किल्ल्याचे संवर्धन व्हावे, तसेच शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दरवर्षी पद्मदुर्ग जागर समिती व संवर्धन समिती मुरुड पद्मदुर्ग जागर कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.
यानिमित्त सकाळी सहा वाजता मुरुड कोळीवाडा येथील राधाकृष्ण मंदिरापासून ते जेट्टीपर्यंत पालखी प्रस्थान, सकाळी 7 ते 9 वाजता स्वच्छता मोहीम, सकाळी 10 वाजता गडदेवता पूजन, सकाळी 11 ते 1 व्याख्यान, शिवपालखी सोहळा व मर्दानी खेळ, दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत महाप्रसाद, दुपारी 2 वाजता पद्मदुर्ग किल्ल्यापासून मुरुडकडे प्रस्थान होणार आहे. दरम्यान, या कार्यक्रमासाठी खा. सुनील तटकरे, आ. भरत गोगावले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व शिवप्रेमी उपस्थित राहणार आहेत.