| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरूड पद्मदुर्ग जागर व गड भ्रमण सामाजिक संस्था, कोकण कडा मित्र मंडळ रायगड व सर्व संलग्न शिवप्रेमी संस्थांच्या वतीने पद्मदुर्ग सोहळा रविवार, दि. 11 जानेवारी रोजी पद्मदुर्ग किल्ल्यावर संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमावेळी मत्स्योद्योग, बंदरे विकास मंत्री नितेश राणे, खा. सुनील तटकरे, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, तहसीलदार आदेश डफल, बंदर निरीक्षक प्रमोद राऊळ, मुरूड जंजिरा नगरपरिषद मुख्याधिकारी सचिन बच्छाव, पुरातत्व विभागाचे अधिकारी बजरंग येलेकर, पोरहित प्रकाश स्वामी जंगम, पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, मुरूड पद्मदुर्ग जागर व गडभ्रमण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आशिलकुमार ठाकूर, राहुल कासार, कोकण कडा मित्र मंडळ रायगड शेखर मामा फरमन, उपाध्यक्ष संकेत वडके, सुरेश पवार, अनिकेत कदम, प्रकाश दाभेकर आदींसह शिवप्रेमी उपस्थित असणार आहेत.
सकाळी 6 वाजता राधाकृष्ण मंदिर ते जेट्टीपर्यंत पालखी प्रस्थान, सकाळी 7 ते 8 वा गड स्वच्छता, सकाळी 8 ते 9 वा. गड सजावट, सकाळी 9.30 वा. गड पूजन, सकाळी 10 वा. गडदेवता कोटेश्वरी माता पूजन सकाळी 10.30 वा, छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा अभिषेक व पूजन सकाळी 11 वाजता, व्याख्यान, मर्दानी खेळ, गडकोट शिवपालखी सोहळा, दुपारी 12.30 वा : कोटेश्वरी माता दर्शन व आरती दुपारी 1 वा : महाप्रसाद, दुपारी 2.00 वा गड स्वच्छता करणार आहोत. तरी शिवप्रेमींनी डोंगरी येथील खोरा बंदरा जवळ येथे उपस्थित राहावे असे आवाहन शिवप्रेमींना करण्यात आले आहे.
11 जानेवारीला पद्मदुर्ग जागर सोहळा
