पद्मदुर्ग किल्ल्याला जेटीची प्रतीक्षा

जंजिरा किल्ल्याला 100 कोटी आणि पद्मदुर्गाला प्रस्ताव नाही; कोकण कडा व पद्मदुर्ग जागर समितीची मागणी

| मुरुड जंजिरा | वार्ताहर |

मुरूडचा पद्मदुर्ग ऊर्फ कासा किल्ला हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात असलेला 1676 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. शिवरायांच्या पद्स्पर्शाने पावन झालेला पद्मदुर्ग किल्ला आज जेटीच्या प्रतीक्षेत आहे. जंजिरा किल्ल्यासाठी नुकतेच 100 कोटी खर्चून जेटी बांधण्यात येणार आहे, मग पद्मदुर्ग किल्ल्यासाठी जेटी बांधण्यासाठी प्रतीक्षा का करावी लागते, असा सवाल महाडचे शिवप्रेमी कोकण कडा व मुरुडच्या पद्मदुर्ग जागर समितीकडून करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील गडकिल्ले यांचे संवर्धन करावे, अशी सरकारची भूमिका असताना शिवरायांचा पद्मदुर्ग वंचित का? कोकण कडाचे अध्यक्ष सुरेश पवार व पद्मदुर्गाचे अध्यक्ष अशील ठाकूर यांची पद्मदुर्ग किल्ल्यासाठी तातडीने जेटी बनवण्याची मागणी पुरातत्व विभागाकडे केली आहे.

Exit mobile version