| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज दक्षिणपिठ नाणीजधाम यांच्या पादुका दर्शनासाठी त्यांच्या अनुयायांनी शनिवारी (दि.11) अलिबागमध्ये मोठ्याप्रमाणावर गर्दी केली होती. माजी आ.पंडित पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, माजी उप नगराध्यक्ष मानसी म्हात्रे, शेकाप नागाव विभाग सचिन राऊळ, चिटणीस नगरसेविका वृषाली ठोसर, अश्विनी पाटील, प्रिया वेलकर आदींनी दर्शन घेतले.

जिल्हा सेवा समिती उत्तर रायगड यांच्यातर्फे जेएसएम कॉलेज मैदानावर पादुका सोहळा आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते .पादुकांसमवेत गुरुपुजनाचा, उपासक दिक्षेचा, प्रवचनाचा व दर्शनाचा लाभ उपस्थित अनुयायांनी घेतला.

यावेळी इयत्ता 8 ते 10 मधील आदिवासी विद्यार्थ्यांना जे रोज 4 ते 5 कि.मी. पायी प्रवास करतात अश्या 52 विद्यार्थांना मोफत सायकल वाटप करण्यात आले. सकाळी अलिबाग शहरात मिरवणूक काढण्यात आली. भगवा झेंडा हातात घेऊन हजारो भक्त या मिरवणुकीत सहभागी झाले होते. ही मिरवणूक ज्या मार्गाने जाणार होती त्या मार्गावर दोन्ही बाजूंनी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.
