। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
बाल दिनानिमित्त शहरातील शिशुविहार शाळेत चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या दिवशी प्रत्येकाच्या मनात लपलेलं बालपण आठवणीच्या रुपात डोळ्यासमोर येऊन जात. प्रत्येकाची आठवणी असणारी एक अविस्मरणीय गोष्ट म्हणजे शाळेत चित्रकला स्पर्धेत काढलेली मनसोक्त अशी चित्र. अशाच संकल्पनेतून उमा(पल्लवी) अनिरुध्द आठवले यांनी शिशु विहार शाळेतील मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित केली.
खर पाहता या मुलांच्या चेहर्यावरचा आनंद बघताना क्रमांक ही फक्त औपचारिकताच होती. पण तरीही या मुलांमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे तीन क्रमांक काढण्यात आले. बालदिनानिमित्त शिशुविहार शाळेत चित्रकला स्पर्धा भरण्यात आली होती. या स्पर्धेचे आयोजक व प्रायोजक उमा आठवले यांनी केले होते. बक्षीस समारंभ माजी मुख्याध्यापिका पळणीटकर तसेच मुख्याध्यापिका वेखंडे, आठवले यांच्या हस्ते करण्यात आले.