पैशाने तुटली नाती संहितेचा शुभारंभ

| चिरनेर । वार्ताहर |

समृद्ध रंगभूमीची परंपरा लाभलेल्या उरण तालुक्यातील रांजणपाडा जासई येथील रंगकर्मी आपली नाट्य परंपरा जोपासत असताना नाटककार हसूराम पाटील यांच्या लेखणीतून पैशाने तुटली नाती या नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे. या नाटकाच्या संहितेचा शुभारंभ रविवार (दि.11) रांजणपाडा जासई येथील नाटककार हसुराम पाटील यांच्या निवासस्थानी अष्टगंध कला मंचाचे अध्यक्ष अशोक म्हात्रे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

दरम्यान येथे जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. त्यामुळे रक्ताच्या नात्यातील वाद हे न्यायालयात आहेत. वडिलोपार्जित मालमत्तेचा हिस्सा मिळत नसल्यामुळे सासरी असलेल्या सासर करणी देखील न्यायालयात गेल्या आहेत. अशा पद्धतीच्या कथानकाचे वास्तववादी चित्रण नाटककार हसूराम पाटील यांनी आगरी संस्कृतीतून घडविले आहे. याप्रसंगी कलाकारांना नाटकाच्या कथानकाबद्दल मार्गदर्शन करताना, ज्येष्ठ दिग्दर्शक धनेश्‍वर म्हात्रे यांनी आगरी लोकांची स्वभाव वैशिष्ट्ये, आगरी भाषेचे वेगळेपण आणि त्यातला गोडवा यामुळे या नाटकातून निखल विनोद निर्मिती होणार आहे. आणि ती प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. त्यातल्या गमती जमतीसह हे नाटक फुलत जाणार आहेत. असे म्हात्रे यांनी यावेळी स्पष्ट केले.

नाटकाचे दिग्दर्शन जेष्ठ दिग्दर्शक धनेश्‍वर म्हात्रे, गजानन म्हात्रे व नरेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. तर नाटकाच्या शुभारंभाचा पहिला प्रयोग पनवेल किंवा नवी मुंबई येथील नाट्यगृहात होणार आहे. नाटकात धनेश्‍वर म्हात्रे, चेतन पाटील, अशोक म्हात्रे, के.डी. म्हात्रे, रोशन घरत, प्रसाद कडू, नवनीत माळी, कुमारी रुचिता म्हात्रे आणि वैशाली मोहिते आदी कलाकार आपल्या अभिनयातून भूमिका बजावणार आहेत.

Exit mobile version