| सुकेळी | प्रतिनिधी |
नागोठणेजवळच असलेल्या बाळसई गावामध्ये नवरात्रोत्सव अतिशय आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे श्री आई बेलजाई मित्र मंडळ बाळसई यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये खास महिलांसाठी होम मिनिस्टर, खेळ पैठणीचा या स्पर्धेचे आयोजन बुधवारी (दि.1) करण्यात आले होते. यामध्ये अनेक महिलांनी सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला.
या स्पर्धेत वेगवेगळ्या प्रकारचे अनेक खेळ खेळण्यात आले. यामध्ये संगीत खुर्ची, फुगे फोडणे, चमचा गोटी, कपामध्ये चेंडू टाकणे असे विविध खेळ खेळण्यात आले. या संपुर्ण स्पर्धेत अंतिम पैठणीची विजेती ठरली धनश्री विनायक पाटेकर. तर उपविजेत्या पदावर मनाली एकनाथ कोकाटे यांना समाधान मानावे लागले. या दोन्ही विजेत्यांना उपस्थित महिलांच्या हस्ते पैठणी देऊन गौरविण्यात आले. यावेळी सर्वच महिलांमध्ये उत्साह दिसून येत होता. या स्पर्धेला श्री आई बेलजाई मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
बाळसई येथे रंगला पैठणीचा खेळ
