महिलांचा उदंड प्रतिसाद
| पनवेल | वार्ताहर |
महिला दिनाचे औचित्य साधून फडके नाट्यगृहात खेळ रंगला पैठणीचा या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुण्या म्हणून महाराष्ट्राची हास्यजत्राफेम अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर उपस्थित होत्या.
याप्रसंगी वर्षा ठाकूर, ममता म्हात्रे, हर्षला तांबोळी, अभिनेत्री प्रतिभा गोरेगावकर, राजू सोनी, प्रथमेश सोमण, गौरव बांठिया, डॉ. सुरेखा मोहकर, प्रीती जॉर्ज, कुसुम पाटील, श्रुती म्हात्रे, रितू डोंगरे, स्वप्निल म्हात्रे, वीरेंद्र जगे, राजेश खेडेकर, प्रतिभा सूर्यवंशी, भक्ती कर्वे, राजश्री सोनी, माधुरी गोसावी, रमेश आंग्रे, प्रदीप आंग्रे, मधुसूदन साखरे आदी मान्यवरांसह महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. निवेदक हरीश मोकल यांच्या निवेदनाने नटलेल्या खेळ रंगाला पैठणीचा या कार्यक्रमादरम्यान महिलांनी पैठणीच्या खेळाचा मनमुरादपणे आनंद लुटला.
पैठणीच्या खेळामध्ये तब्बल 300 हुन अधिक महिलांनी सहभाग घेतला. ज्यामध्ये अंतिम फेरीसाठी 8 महिलांनी प्रवेश मिळवला. अंतिम फेरीत चुरशीच्या खेळामध्ये शेवटच्या आठ महिलांपैकी अव्वल ठरलेल्या मीनाक्षी पाटील (प्रथम), सुनिता कुडवे (द्वितीय) आणि कांचन गडकरी (तृतीय) या तिघींना मानाच्या पैठण्या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या. तसेच यावेळी नाट्यगृहात उपस्थित महिलांसाठी लकी ड्रॉ ठेवण्यात आला होता. या लकी ड्रॉमध्ये विजेत्या ठरलेल्या पाच महिलांना देखील पारितोषिकांच्या रुपात पाच पैठण्या प्रदान करण्यात आल्या. याशिवाय प्रेक्षक महिलांनासुद्धा उखाण्यांसाठी विशेष भेटवस्तू देण्यात आल्या. गायक हरीश मोकल व सुवर्णा मातोंडकर यांनी सादर केलेल्या गीतांवर उपस्थित महिलांनी ठेका धरला व मनमुरादपणे नृत्य करत गाण्यांचा आनंद लुटला.