| नेरळ | वार्ताहर |
नेरळ वंजारपाडा येथे राहणारे उत्कृष्ट पखवाज आणि तबलावादक किशोर भवारे यांना आर्ट बिट्स फाऊंडेशन पुणे यांचा राज्यस्तरीय पुरस्कार 2024 देऊन सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार मिळाल्याने किशोर भवारे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. किशोर भवारे हे कर्जत तालुक्यातील अनेक भजन कलाकारांना भजनात पखवाज तसेच तबला वाजवण्याचे काम करत आहेत. कर्जतसह रायगड, ठाणे, पालघर, मुंबई आदी ठिकाणी ते वादक म्हणून अनेक गायकांना साथ देत आहेत. तबला विशारद अनिल गावडे वडाळा (मुंबई) यांच्याकडे ते वादनाचे शिक्षण घेत आहेत. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आ. महेंद्र थोरवे यांनीदेखील त्यांचा सन्मान केला आहे. यावेळी कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती अमर मिसाळ, अंकुश दाभाने, सुरेश खाडे आदी यावेळी उपस्थित होते.