विश्वचषकासाठी संघ भारतात येणार
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
आगामी वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानी संघाला हिंदुस्थानात पाठवण्यावरून बीसीसीआय आणि आयसीसीला अडचणीत आणणाऱ्या पाकिस्तानी सरकारने अखेर आपली नकारघंटा थांबवत आपल्या क्रिकेट संघाला हिंदुस्थान दौऱ्यावर जाण्याची परवानगी दिली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव पाकिस्तान सरकारने आपल्या क्रिकेट संघाला विश्वचषक खेळण्याची हिंदुस्थानात क्रिकेट संघाला पाठवण्याची परवानगी दिली नव्हती. मात्र, आता त्यांनी आपला निर्णय जाहीर करत आपल्या संघाबाबत असलेली अनिश्चितता संपुष्टात आणली आहे. मात्र, त्यांचा संघ अहमदाबादेत खेळणार की नाही, याबाबत स्पष्टता जाहीर केलेली नाही.
पाकिस्तानी सरकारने क्रिकेट संघाला परवानगी देताना उभय राष्ट्रांमधील खेळांमध्ये राजकारण आणले जाऊ नये. खेळाकडे खेळाच्याच नजरेने पाहावे. पाकिस्तानात आशिया चषक असतानाही हिंदुस्थानी सरकारने क्रिकेट संघाला खेळण्याची परवानगी दिली नव्हती. त्यामुळे पाकिस्तानातील निम्मी स्पर्धा श्रीलंकेत खेळविली जाणार आहे. पाकिस्तानी सरकारने आपल्या संघाची फार काळजी वाटत असून, भारत सरकार त्यांना पूर्ण सुरक्षा पुरवेल, अशी आशा व्यक्त केली आहे.