गुजरातमध्ये 400 कोटींचे हेरॉइन सह पाकिस्तानी बोट व 6 जण ताब्यात

। मुंबई । वृत्तसंस्था ।
गांधीनगर – गुजरातमध्ये भारतीय तटरक्षकदल आणि गुजरात एटीएसन संयुक्त कारवाईत तब्बल 400 कोटी रुपयांचे हेरॉइन जप्त केलं आहे. भारताच्या जल हद्दीत 6 चालकांसह पाकिस्तानी नाव ताब्यात घेण्यात आली आहे. अल हुसैनी ही पाकिस्तानी नौाका पथकाने ताब्यात घेतली. अधिकार्‍यांना गस्त घालत असताना गुजरात किनारपट्टीजवळ एक पाकिस्तानी नाव दिसली. त्यावर असलेल्या सहा संशयितांना अटक कऱण्यात आली आहे. त्यांच्याकडून 77 किलो हेरॉइन जप्त करण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारानुसार याची किंमत 400 कोटी रुपये इतकी असून सध्या अधिक तपास सुरु आहे.
गुजरात सीमेवर घुसखोरांवर करडी नजर ठेवणार्‍या भारतीय तटरक्षक दलाच्या आणि एटीएसच्या संयुक्त मोहिमेवेळी पाकिस्तानी बोट अल हुसैनी आढळली. त्यानंतर जवानांनी तात्काळ बोटीवर कारवाई करत मुद्देमालासह 6 जणांना ताब्यात घेण्यात आलं. बोटीवर असणारे सर्वजण हेरॉइनच्या तस्करीत होते.
याआधी सप्टेंबरमध्ये भारतीय तटरक्षक दलाने गस्त घालत असताना 12 जणांसह पाकिस्तानी बोट पकडली होती. ती नाव गुजरात किनारपट्टीपासून दूर अंतरावर होती. खराब हवामान असतानाही तेव्हा भारतीय तटरक्षक दलाने पाकिस्तानी नाव पकडली होती.

Exit mobile version