हॉटेलचे भरायला पैसे नसल्याने नामुष्की
| कॅनबेरा | वृत्तसंस्था |
पाकिस्तान हॉकी संघ नुकताच ऑस्ट्रेलियात दाखल झाला. राजधानी कॅनबेरा इथं आल्यानंतर, संघाला काही तास रस्त्यावर घालवावे लागले. खरं तर, व्यवस्थापन हॉटेलचं बिल वेळेवर भरु शकलं नाही, परिणामी त्यांचं हॉटेल बुकिंग रद्द करावं लागलं. पाकिस्तान मोठ्या गोष्टींचा अभिमान बाळगतो, परंतु त्यांच्या संघासाठी हॉटेल बुक करण्यासाठी त्यांच्याकडे पैसेही नाहीत. पाकिस्तान संघ नुकताच ऋखक प्रो लीगमध्ये खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेला आहे आणि दरम्यान, खेळाडूंच्या अडचणी वाढत असल्याचे दिसून येते.
प्रो लीगचा दुसरा टप्पा खेळण्यासाठी पाकिस्ताननं आपला हॉकी संघ ऑस्ट्रेलियातील होबार्ट इथं पाठवला आहे. पाकिस्तान हॉकी फेडरेशननं खेळाडू आणि व्यवस्थापनासाठी चार स्टार हॉटेल बुक केलं होतं. खेळाडूंना कळवण्यात आलं की पाकिस्तान बोर्डानं कॅनबेरामध्ये संघाच्या राहण्याची व्यवस्था केली आहे. गेल्या आठवड्यात जेव्हा संघ कॅनबेरा येथे पोहोचला तेव्हा त्यांना कळालं की बिल भरता येत नसल्यानं हॉटेल बुकिंग नाही.
पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक ताहिर जमान वेळेच्या फरकामुळं बोर्डाशी बोलू शकले नाहीत. यामुळं, लांब प्रवासानंतर खेळाडूंना विश्रांतीसाठी जागा नव्हती. अहवालात असंही म्हटलं आहे की खोल्या उपलब्ध नव्हत्या, ज्यामुळं दोन किंवा तीन खेळाडूंना एकाच खोलीत राहावं लागले. पाकिस्तान संघ योग्य तयारी करु शकला नाही आणि दुसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2-3 असा पराभव पत्करावा लागला.
पाकिस्तान संघाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, अर्जेंटिनामधील प्रो लीगच्या पहिल्या टप्प्यात, खेळाडूंना त्यांचं दैनंदिन वेतन देण्यात आलं नव्हतं, ज्यामुळं आर्थिक अडचणी निर्माण झाल्या. आता, ऑस्ट्रेलियामध्ये, निधीच्या कमतरतेमुळं आणि हॉटेल बुक करण्यास असमर्थतेमुळं पाकिस्तान संघाला समस्यांचा सामना करावा लागला. नंतर, ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या पाकिस्तानी लोकांनी त्यांना मदत केली.







