पाकिस्तानचा अब्दुल रझाक टीकेच्या रडारवर

ऐश्वर्या रायबद्दल घाणेरडं वक्तव्य, क्रिकेटप्रेमी भडकले
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझाक यानं एका टीव्ही कार्यक्रमामध्ये पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या कामगिरीबाबत बोलताना अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिच्याबद्दल अत्यंत घाणेरडी आणि अभद्र टिप्पणी केली आहे. त्याच्या या विधानामुळं तो टीकेच्या रडारवर आला आहे. सोशल मीडियातून त्यांच्यावर सडकून टीका होत आहे.

पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाच्या हेतूबद्दल रझाक बोलत होता. ‘संघानं चांगली कामगिरी करावी असं वाटत असेल तर त्या दिशेनं तुम्ही प्रयत्न करायला हवा. तुमचा हेतू प्रामाणिक हवा. तुम्ही म्हणाल की ऐश्वर्या राय बच्चनशी लग्न करून मी आदर्श मुलं जन्माला घालीन, तर तसं अजिबात शक्य नाही. तुम्हाला तुमचं ध्येय आधी ठरवावं लागेल आणि हेतू प्रामाणिक असावा लागेल, असं रझाक म्हणाला.

रझाकच्या या टिप्पणीवर शोमध्ये उपस्थित असलेले शाहिद आफ्रिदी, उमर गुल हे क्रिकेटपटू फिदीफिदी हसताना दिसले. पाकिस्तानी आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांना मात्र रझाकचं हे वक्तव्य अजिबात आवडलेलं दिसत नाही. सर्वच चाहत्यांनी त्याच्यावर टीकेचा भडिमार केला आहे. गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग पाकिस्तानी क्रिकेटपटूंना जी वागणूक देतात ती योग्यच आहे, असं एका युजरनं म्हटलं आहे.

Exit mobile version